MPSC परीक्षांच्या उत्तरपत्रक व मूल्यांकन प्रक्रियेत बदल मार्च 1 2026 पासून लागू.

Oct 29, 2025 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) १ मार्च २०२६ पासून वस्तुनिष्ठ परीक्षांच्या उत्तरपत्रिका आणि मूल्यमापन प्रक्रियेत मोठे बदल जाहीर केले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, मानकीकरण आणि जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले असून, याचा हजारो उमेदवारांवर परिणाम होणार आहे.