उत्तर प्रदेशला ४ वर्षांनंतर मिळाला पोलीस प्रमुख; ज्येष्ठ आयपीएस अधिकारी राजीव कृष्ण राज्याचे नवे 'डीजीपी'
उत्तर प्रदेशमधील पोलीस प्रशासनाच्या सर्वोच्च पदाबाबतची गेल्या चार वर्षांची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने १९९१ बॅचचे ज्येष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी राजीव कृष्ण (Rajiv Krishna) यांची उत्तर प्रदेशचे नवे पूर्णवेळ आणि स्थायी पोलीस महासंचालक (DGP - Director General of Police) म्हणून नियुक्ती केली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद यांनी या नियुक्तीच...