गुरिंदरवीर सिंगचा १०० मीटर शर्यतीत ऐतिहासिक राष्ट्रीय विक्रम
रांची (झारखंड):भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी ऐतिहासिक कामगिरी पंजाबच्या २५ वर्षीय गुरिंदरवीर सिंगने (Gurindervir Singh) करून दाखवली आहे. झारखंडमधील रांची येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत (Federation Cup 2026) त्याने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. १०.१० सेकंदांचा टप्पा मोडणारा पहिला भारतीयगुरिंदरवीरने ही अंतिम शर्यत अवघ्या
१०.०९ सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात १०० मीटर शर्यतीचा १०.१० सेकंदांचा टप्पा पार करणारा तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे. या कामगिरीसह तो भारताचा सर्वात वेगवान धावपटू बनला असून चालू हंगामात आशिया खंडातील दुसरा सर्वात वेगवान धावपटू ठरला आहे.