फिट इंडिया संडेझ ऑन सायकल'च्या ७५ व्या ऐतिहासिक आवृत्तीने अहमदाबादमध्ये इतिहास रचला
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'फिट इंडिया मोहिमे'ला देशात एक नवे मोठे यश मिळाले आहे. 'फिट इंडिया संडेझ ऑन सायकल' (Fit India Sundays on Cycle) या लोकप्रिय मोहिमेची ७५ वी विशेष आवृत्ती गुजरात मधील अहमदाबाद शहरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या ऐतिहासिक आवृत्तीच्या निमित्ताने संपूर्ण देशातील ८,००० हून अधिक ठिकाणी लाखो नागरिकांनी एकाच वेळी सायकल चालवून आरोग्याचा संदेश दिला.
साबरमती रिव्हरफ्रंटवर ५,००० सायकलस्वारांचा महापूरअहमदाबादमधील आयकॉनिक साबरमती रिव्हरफ्रंटवरून या राष्ट्रीय उत्सवाचे नेतृत्व करण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी आणि बॉलिवूड अभिनेता व 'फिट इंडिया आयकॉन' आयुष्मान खुराणा यांनी ५,००० हून अधिक सायकलस्वार, खेळाडू आणि युवा स्वयंसेवकांसह या भव्य सायकल रॅलीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.