पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही", केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
'पासपोर्ट सेवा दिना'चे औचित्य साधून परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारतीय पासपोर्ट हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आणि ओळखीसाठी जारी केलेले दस्तऐवज (Travel Document) आहे, तो नागरिकत्वाचा अंतिम कायदेशीर पुरावा मानला जाऊ शकत नाही. नागरिकत्व कायदा १९५५ नुसारच नागरिकत्व निश्चित होते.