११ व्या सँडा वर्ल्ड कपमध्ये भारतीय वुशू संघाची ऐतिहासिक कामगिरी पटकावली ५ पदके
चीनमधील मकाऊ (Macau) येथे पार पडलेल्या ११ व्या सँडा वर्ल्ड कप २०२६ (11th Sanda World Cup) मध्ये भारतीय वुशू (Wushu) संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ५ पदके (२ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य) जिंकली आहेत. या ऐतिहासिक कामगिरीसह भारताने पदकतालिकेत चीन आणि व्हिएतनामपाठोपाठ तिसरे स्थान पटकावले आहे.
या स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी कमालीचे वर्चस्व गाजवले. महिलांच्या ७५ किलो वजनी गटात सीमा सुरक्षा दलाची (BSF) खेळाडू शिवानी हिने रशियन प्रतिस्पर्ध्याला नमवून सुवर्णपदक जिंकले. तर ५२ किलो वजनी गटात अपर्णा दहिया हिने जागतिक चॅम्पियन व्हिएतनामच्या खेळाडूला पराभूत करत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुष गटात भारतीय हवाई दलाच्या (IAF) कुशल कुमार याने ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक, तर करीना कौशिक आणि सागर दहिया यांनी कांस्य पदके जिंकून भारताच्या एकूण पदकांची संख्या ५ वर पोहोचवली.