भालाफेकमध्ये आशियाचा नवा 'किंग'; श्रीलंकेच्या रुमेश थरंगाने ९२.६२ मीटर भाला फेकून रचला इतिहास
श्रीलंकेचा अवघ्या २३ वर्षांचा तरुण भालाफेकपटू रुमेश थरंगा पाथिरागे (Rumesh Tharanga Pathirage) याने 'रोम डायमंड लीग २०२६' (Rome Diamond League) मध्ये ९२.६२ मीटरचा ऐतिहासिक थ्रो करत जागतिक ॲथलेटिक्समध्ये खळबळ माजवून दिली आहे. या भीमपराक्रमासह रुमेश थरंगा भालाफेक (Javelin Throw) प्रकारात ९० मीटरचा टप्पा पार करणारा आशियातील चौथा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी आशियातून केवळ भारताचा नीरज चोप्रा (९०.२३ मी), पाकिस्तानचा अर्शद नदीम (९२.९७ मी) आणि चिनी तैपेईचा चेंग चाओ-त्सुन (९१.३६ मी) यांनाच हा टप्पा ओलांडता आला होता. रुमेशने आता नीरज चोप्राला मागे टाकत आशियाई इतिहासातील दुसरा सर्वोत्तम थ्रो नोंदवला आहे.