जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) या महत्त्वाकांक्षी योजनेला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली: केंद्र सरकारने ग्रामीण भागात सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) या महत्त्वाकांक्षी योजनेला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मिशनची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.