मेघालयात बहुराष्ट्रीय सैन्य सराव 'प्रगती २०२६.
भारताच्या यजमानपदाखाली 'प्रगती २०२६' (PRAGATI 2026) या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाला मेघालयातील उमरोई मिलिटरी स्टेशन (Umroi Military Station) येथे सुरुवात झाली आहे. या सरावात भारतासह एकूण १३ देशांचे सैन्य सहभागी झाले असून, यामध्ये भारत आणि इतर १२ मित्र देशांचा (भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सेशेल्स आणि व्हिएतनाम) समावेश आहे.
'PRAGATI' म्हणजे 'Partnership of Regional Armies for Growth and Transformation in the Indian Ocean Region'. दोन आठवडे चालणाऱ्या या सरावाचा मुख्य उद्देश हिंदी महासागर क्षेत्रातील प्रादेशिक सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये परस्पर समन्वय वाढवणे हा आहे. या सरावादरम्यान निम-पर्वतीय आणि जंगल भागातील आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त नियोजन आणि तांत्रिक कवायती केल्या जात आहेत. तसेच 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत भारतीय संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही येथे केले जात आहे.