ड्रोन स्वॉर्म सिस्टम मध्ये चीनने एक मोठी झेप घेतली .
बीजिंग:संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानात चीनने एक मोठी झेप घेतली असून 'अॅटलस' (Atlas) ड्रोन स्वॉर्म सिस्टम नावाचे एक अत्यंत घातक शस्त्र जगासमोर आणले आहे. हे केवळ साधे ड्रोन नसून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून एकाच वेळी शत्रूवर तुटून पडणाऱ्या 'मधमाशांच्या थव्या'सारखी ही प्रणाली काम करते.
एकाच वेळी हल्ला: ही यंत्रणा अवघ्या ३०० सेकंदात (५ मिनिटांत) ९६ ड्रोन हवेत झेप घेऊ शकतात.
एक ऑपरेटर, १०० ड्रोन: अवघ्या एका ऑपरेटरला टच स्क्रीनच्या मदतीने जवळजवळ १०० ड्रोन नियंत्रित करणे शक्य आहे.
स्वयंचलित निर्णय: हे ड्रोन एआयच्या मदतीने स्वतःच लक्ष्याची ओळख पटवू शकतात आणि आपापसात संवाद साधून हल्ला करू शकतात.
वेग आणि मारक क्षमता: दर ३ सेकंदाला एक ड्रोन लाँच करण्याची क्षमता या सिस्टममध्ये आहे.