महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! नागपूरचे ‘सतनावरी’ होणार देशातील पहिले Smart & Intelligent Village
नागपूर: महाराष्ट्र सरकारने तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. नागपूर जिल्ह्यातील सतनावरी (Satnavari) या गावाची भारतातील पहिले 'स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज' (Smart & Intelligent Village) म्हणून निवड करण्यात आली असून, येथे विशेष पायलट प्रोजेक्ट राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हा प्रकल्प राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान (IT) विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणार आहे. या मॉडेलच्या यशानंतर राज्यातील इतर गावांमध्येही हे तंत्रज्ञान वापरले जाईल.
Smart & Intelligent' गावाची वैशिष्ट्ये?
डिजिटल कनेक्टिव्हिटी: संपूर्ण गाव हाय-स्पीड वाय-फाय आणि फायबर इंटरनेटने जोडले जाईल.
स्मार्ट हेल्थकेअर: टेलि-मेडिसिन सुविधा आणि डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्सच्या माध्यमातून ग्रामस्थांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला गावातच मिळेल.
इंटेलिजेंट शेती: शेतकऱ्यांसाठी मातीचे आरोग्य, हवामान अंदाज आणि पिकांवरील रोगांची माहिती देणारी सेन्सॉर-आधारित प्रणाली कार्यान्वित केली जाईल.
शिक्षण: जिल्हा परिषद शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम आणि टॅब-आधारित शिक्षणाची सोय असेल.
प्रशासन: ई-ग्रामपंचायत आणि डिजिटल पेमेंट सुविधेमुळे गाव पूर्णपणे कॅशलेस आणि पेपरलेस होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना म्हटले की, सतनावरी हे गाव केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी ग्रामीण विकासाचे एक आधुनिक मॉडेल ठरेल.