गणेश लक्ष्मीनारायणन यांची टाटा कम्युनिकेशन्सच्या एमडी आणि सीईओपदी नियुक्ती
मुंबई: जागतिक स्तरावर डिजिटल इकोसिस्टम सक्षम करणाऱ्या 'टाटा कम्युनिकेशन्स' (Tata Communications) कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी गणेश लक्ष्मीनारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्याचे एमडी आणि सीईओ ए.एस. लक्ष्मीनारायणन यांची जागा घेतील, जे १३ एप्रिल २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
गणेश लक्ष्मीनारायणन यांच्याकडे तंत्रज्ञान आणि टेलिकॉम क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक काळाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी 'सर्व्हिसनाऊ' (ServiceNow) इंडिया आणि सार्क देशांचे एमडी म्हणून काम पाहिले आहे, तसेच त्यांनी 'एअरटेल बिझनेस'चे सीईओ म्हणूनही यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा कम्युनिकेशन्स जागतिक स्तरावर आपला विस्तार आणि तांत्रिक प्रगती अधिक वेगाने करेल, असा विश्वास टाटा समूहाने व्यक्त केला आहे.