प्रजासत्ताक दिन 'भारत पर्व' महोत्सवात महाराष्ट्राच्या 'मधाचे गाव' चित्ररथाचे दर्शन

Jan 22, 2026 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा

Get the TryMCQ App

Install the app for full current affairs, exams, and faster access on your phone.

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय 'भारत पर्व २०२६' महोत्सवात महाराष्ट्राचा 'मधाचे गाव - मांगर' (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) या संकल्पनेवर आधारित चित्ररथ आकर्षणाचे केंद्र ठरला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राने आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या 'मध' उद्योगाचे प्रभावी सादरीकरण केले.

मांगर हे देशातील पहिले 'मधाचे गाव' म्हणून ओळखले जाते. या चित्ररथाच्या माध्यमातून मधमाशी पालन, मध उत्पादन आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार तसेच पर्यावरणाचे रक्षण असा संदेश देण्यात आला. या चित्ररथावर मधमाशांच्या पोळ्यांची प्रतिकृती, फुलांच्या बागा आणि आधुनिक मध उत्पादन प्रक्रिया दर्शवण्यात आली होती. 'व्होकल्स फॉर लोकल' आणि 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेला बळ देणारा हा उपक्रम दिल्लीकरांच्या पसंतीस उतरला.