भारतीय रेल्वेमध्ये नोकरी १०वी पास उमेदवारांसाठी 'रेल व्हील फॅक्टरी'त भरती
Published
08 Mar 2026, 05:22 PM
भारतीय रेल्वेच्या 'रेल व्हील फॅक्टरी' (RWF), येलाहंका, बंगळुरू येथे शिकाऊ उमेदवारांसाठी (Act Apprentice) मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १९२ रिक्त जागा भरल्या जाणार असून, केवळ १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे.
पदाचे नाव शिकाऊ उमेदवार (Act Apprentice)
एकूण जागा १९२
पात्रता ५०% गुणांसह १०वी पास + ITI (NCVT प्रमाणपत्र)
वयोमर्यादा १५ ते २४ वर्षे (१ मार्च २०२६ पर्यंत)
वयात सवलत SC/ST: ५ वर्षे, OBC: ३ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन (टपालाद्वारे किंवा ड्रॉप बॉक्समध्ये)
अंतिम तारीख ०१ एप्रिल २०२६ (सायंकाळी ५:००
प्रमुख ट्रेड्स आणि जागा:
फिटर: ८५ जागा
मशिनिस्ट: ३१ जागा
इलेक्ट्रिशियन: १८ जागा
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: २२ जागा
सीएनसी (CNC) ऑपरेटर: २३ जागा
इतर (टर्नर/मोटर मेकॅनिक): १३ जागा
निवड प्रक्रिया:
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही त्यांच्या १०वीच्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्तेनुसार (Merit List) केली जाईल.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM