एकाच दिवशी दोन मैदानी चाचण्या? आता काळजी नको! ( नवीन GR ) • Update
TryMcq App
सरळ सेवा - Previous Year Question Papers and Current Affairs

Install App

Get it on Google Play

एकाच दिवशी दोन मैदानी चाचण्या? आता काळजी नको! ( नवीन GR )

Published 13 Feb 2026, 03:45 PM
एकाच दिवशी दोन मैदानी चाचण्या? आता काळजी नको! ( नवीन GR )
राज्यभरात सध्या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२४-२५ ची प्रक्रिया अत्यंत उत्साहात सुरू आहे. काल, ११ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस शिपाई पदासाठीची शारीरिक (मैदानी) चाचणी सुरू झाली असून, या प्रक्रियेत उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन गृह विभागाने अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शक निकष जाहीर केले आहेत. ज्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्यांच्या तारखा एकाच दिवशी किंवा लागोपाठ आल्या आहेत, त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष दिलासा दिला आहे. एकाच दिवशी दोन चाचण्या? आता काळजी नको! अनेक उमेदवारांनी पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशा विविध पदांसाठी अर्ज केले आहेत. यापैकी काही उमेदवारांच्या शारीरिक चाचण्यांची वेळ आणि दिनांक एकाच दिवशी आल्याचे निदर्शनास आले होते. यावर तोडगा म्हणून 'महाआयटी' विभागाने अशा उमेदवारांच्या चाचणीच्या तारखांमध्ये बदल केला असून, नवीन वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. संबंधित उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारेही ही माहिती कळवण्यात आली आहे. घटक प्रमुखांना विशेष अधिकार शासनाने जारी केलेल्या नव्या पत्रांनुसार, जर एखाद्या उमेदवाराची चाचणी लागोपाठच्या दिवशी असेल आणि केंद्रावर पोहोचणे शक्य नसेल, तर अशा वेळी स्थानिक 'घटक प्रमुख' (Unit Commander) त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊ शकतील. उमेदवाराने ज्या केंद्रावर प्रथम उपस्थिती लावली आहे, तेथील घटक प्रमुखांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर सही-शिक्का मारून ते उमेदवार तिथे हजर होते, असे प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर उमेदवाराला दुसऱ्या केंद्रावर नवीन तारीख दिली जाईल. उमेदवार अपात्र ठरणार नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एखादा उमेदवार तांत्रिक कारणास्तव किंवा प्रवासातील अडचणींमुळे ठरलेल्या वेळेत मैदानी चाचणीसाठी पोहोचू शकला नाही, तर त्याला थेट 'अपात्र' ठरवले जाणार नाही. अशा उमेदवारांना अन्य दिनांकास बोलावून त्यांची चाचणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे मैदानी चाचणीसाठी धावपळ करणाऱ्या हजारो तरुणांना मोठा आधार मिळाला आहे.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM
More updates

.

TryMcq App
सरळ सेवा - Previous Year Question Papers and Current Affairs

Install App

Get it on Google Play
<