२७ एप्रिलपासून SSC GD च्या परीक्षेला सुरुवात.
Published
14 Apr 2026, 02:53 PM
नवी दिल्ली:
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 'जीडी कॉन्स्टेबल परीक्षा २०२६' ची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. आयोगाने या परीक्षेचे सुधारित आणि सविस्तर वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले असून, परीक्षा आता एप्रिल आणि मे २०२६ मध्ये पार पडणार आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
एसएससीच्या नवीन अधिसूचनेनुसार, २७ एप्रिल २०२६ पासून परीक्षेला सुरुवात होईल आणि ३० मे २०२६ पर्यंत ही प्रक्रिया चालेल. ही परीक्षा एकूण चार आठवड्यांच्या टप्प्यात विभागली गेली आहे:
पहिला आठवडा: २७ एप्रिल ते २ मे २०२६
दुसरा आठवडा: ४ मे ते ९ मे २०२६
तिसरा आठवडा: १८ मे ते २३ मे २०२६
चौथा आठवडा: २५ मे ते ३० मे २०२६
परीक्षा आठवड्याची निवड (Preference Window): उमेदवारांना त्यांच्या परीक्षेचा आठवडा निवडण्यासाठी ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्र (Admit Card): परीक्षेच्या साधारणपणे ३-४ दिवस आधी रिजनल वेबसाइट्सवर प्रवेशपत्र उपलब्ध होतील.
परीक्षेचे स्वरूप: परीक्षा ऑनलाइन (CBT) पद्धतीने होईल. यामध्ये ८० प्रश्न (१६० गुण) असतील आणि वेळ १ तासाचा असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पाव गुणाचे (०.२५) नकारात्मक गुणदान (Negative Marking) असेल.
एकूण जागा: या भरतीद्वारे एकूण २५,४८७ जागा भरल्या जाणार आहेत.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM