महाराष्ट्रात 4600+ तलाठी पदांची नवी भरती ; महाराष्ट्र महसूल विभागाकडून नवीन आकृतीबंध मंजूर • Update
TryMcq App
अग्निवीर Air Force - Previous Year Question Papers and Current Affairs

Install App

Get it on Google Play

महाराष्ट्रात 4600+ तलाठी पदांची नवी भरती ; महाराष्ट्र महसूल विभागाकडून नवीन आकृतीबंध मंजूर

Published 04 Apr 2026, 01:47 PM
महाराष्ट्रात 4600+ तलाठी पदांची नवी भरती ; महाराष्ट्र महसूल विभागाकडून नवीन आकृतीबंध मंजूर
राज्य सरकारने महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर केला असून, त्यानुसार राज्यात तलाठी पदांची एकूण १५,७४७ पदे मंजूर करण्यात आली आहेत. वाढत्या कामाचा ताण आणि ग्रामीण भागातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी ही पदे भरली जाणार आहेत.मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या '१ लाख पदांच्या महाभरती' अंतर्गत महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे या भरतीमध्ये ग्रामीण प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या तलाठी संवर्गासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. एकूण ४,६४४ तलाठी पदांपैकी १,७०० पदे ही नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. तसेच, प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक अशी लिपिकवर्गीय पदांची मोठी फळी उभारली जाणार आहे.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM
More updates

.

TryMcq App
अग्निवीर Air Force - Previous Year Question Papers and Current Affairs

Install App

Get it on Google Play
<