SSC मार्फत ३,००३ पदांची मेगा भरती.
Published
14 Apr 2026, 02:41 PM
नवी दिल्ली:
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 'Selection Post Phase XIV/2026' साठी अधिकृत अधिसूचना (Notification) प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये एकूण ३,००३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. १० वी, १२ वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध झाली आहे.
या भरतीमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट, डेप्युटी रेंजर, अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), सायंटिफिक असिस्टंट आणि तांत्रिक सहाय्यक यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.
ही पदे मॅट्रिक्युलेशन (१० वी), उच्च माध्यमिक (१२ वी) आणि पदवी अशा तिन्ही शैक्षणिक स्तरांवर विभागलेली आहेत.
A. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
ही भरती तीन वेगवेगळ्या स्तरांवर घेतली जाते. उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी पात्र असल्यास स्वतंत्र अर्ज करू शकतात:
१. मॅट्रिक्युलेशन: १० वी उत्तीर्ण.
२. उच्च माध्यमिक: १२ वी उत्तीर्ण.
३. पदवी: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate).
B. वयोमर्यादा (Age Limit)
किमान वय: १८ वर्षे.
कमाल वय: ३० वर्षे (काही पदांसाठी २५ किंवा २७ वर्षे असू शकते).
वयातील सवलत: SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षे सवलत मिळेल.
टप्पा १: संगणक आधारित परीक्षा (CBT).
टप्पा २: कौशल्य चाचणी (Skill Test/Typing) - फक्त काही विशिष्ट पदांसाठी.
टप्पा ३: कागदपत्र पडताळणी (Document Verification).
Last updated on 05 May 2026, 12:15 PM