MMRDA मध्ये २३५ जागांसाठी मेगा भरती!
Published
08 Mar 2026, 04:55 PM
मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे अभियंता, उप लेखापाल, आणि इतर तांत्रिक व अतांत्रिक अशा एकूण २३५ जागा भरल्या जाणार आहेत.
एकूण पदे: २३५
पदांची नावे: सहाय्यक अभियंता (श्रेणी १ व २), कनिष्ठ अभियंता, उप नियोजक, उप लेखापाल, भूमापक (Surveyor), लघुटंकलेखक (Stenographer) आणि संगणक तंत्रज्ञ.
शैक्षणिक पात्रता: पदांनुसार १०वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI), पदविका (Diploma), पदवी (BE/B.Tech/B.Com/LLB) आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव.
वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सवलत).
वेतनश्रेणी: ₹१९,९०० ते ₹१,७७,५०० पर्यंत (सातव्या वेतन आयोगानुसार).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मार्च २०२६
अर्ज पद्धत: फक्त ऑनलाईन (Online)
Last updated on 05 May 2026, 12:15 PM