राज्यात 30 हजार शिक्षकेतर पदांची भरती होणार
Published
14 Mar 2026, 09:51 PM
साधारण ३० हजार पदांची भरती होण्याची शक्यता
शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आता ठोस पावले उचलली आहेत. यासाठी नवीन पात्रता निकष आणि अटी जाहीर करण्यात आल्या असून, या प्रक्रियेला ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ असे नाव देण्यात आले आहे. या नव्या नियमांच्या आधारावरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला पुन्हा गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साधारण ३० हजार पदांची भरती होण्याची शक्यता
राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये नव्या निकषांनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे निर्माण होणार आहेत. यानुसार, कनिष्ठ लिपिक पदे १७,६९५, वरिष्ठ लिपिक पदे ४,९१२, मुख्य लिपिक पदे ९२३ इतकी असतील. तसेच ग्रंथपाल पदे २,११८, नववी-दहावी साठी प्रयोगशाळा सहायक पदे ४,६८५ आणि उच्च माध्यमिक साठी प्रयोगशाळा सहायक पदे २,०४० अशी एकूण रचना प्रस्तावित आहे. या शासन निर्णयामुळे रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची संधी उपलब्ध होणार असून, तब्बल २१ वर्षांनंतर ही प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM