महाराष्ट्र RTO ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या भरती • Update
TryMcq App
तलाठी - Previous Year Question Papers and Current Affairs

Install App

Get it on Google Play

महाराष्ट्र RTO ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या भरती

Published 04 Apr 2026, 12:59 PM
महाराष्ट्र RTO  ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या भरती
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात नोकरीची सुवर्णसंधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. परिवहन विभागाने ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदांच्या भरतीसाठी शासनाकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला असून, लवकरच या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही काळापासून आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती. अलीकडेच विभागात मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये ३२८ सहाय्यक निरीक्षकांना 'मोटार वाहन निरीक्षक' पदी बढती देण्यात आली, ज्यामुळे कनिष्ठ स्तरावरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहेत. सद्यस्थितीत एकूण मंजूर १,१५८ पदांपैकी सुमारे ३० टक्के पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४६१ पदांचा हा प्रस्ताव सध्या अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राबवण्यात येणार आहे. शासनाची मंजुरी मिळताच MPSC कडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM
More updates

.

TryMcq App
तलाठी - Previous Year Question Papers and Current Affairs

Install App

Get it on Google Play
<