महाराष्ट्र पोलीस भरती 2025–26 अनिश्चित काळासाठी स्थगित! • Update
TryMcq App
महाराष्ट्र पोलीस - मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका आणि चालू घडामोडी साठी

Install App

Get it on Google Play

महाराष्ट्र पोलीस भरती 2025–26 अनिश्चित काळासाठी स्थगित!

Published 11 Jan 2026, 08:50 AM
महाराष्ट्र पोलीस भरती 2025–26 अनिश्चित काळासाठी स्थगित!
20 जानेवारी 2026 पासून बऱ्याच जिल्ह्यांचे मैदानी चाचणी सुरू होणार होती. पण आता ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकली गेली आहे, याची माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी दिली. याचे कारण येणारे आगामी महानगरपालिका व नगरपालिका याची निवडणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे दिसत आहे. कारण 20 जानेवारी 2026 मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे की 2025 मध्ये जवळपास 9000 होमगार्ड पदावर रुजू झाले आहेत या विद्यार्थ्यांनी आगामी पोलीस भरतीमुळे बंदोबस्तासाठी जाण्याचा नकार दिला आणि मैदानी तयारीवर संपूर्ण लक्ष दिले आहे याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसून आलेला असे पाहायला मिळत आहे. आता हे महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी पुढे ढकलण्याचे मुख्य कारण असेल असे समजले जात आहे. परंतु याच्याबद्दल स्पष्टीकरण पोलीस महासंचालक त्यांच्याकडून मिळालेले नाही. अद्याप असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे विद्यार्थी होमगार्ड पदासाठी रुजू आहेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर मिळालेल्या बंदोबस्तासाठी हजर राहण्याचे आदेश पोलीस महासंचालक यांनी दिलेले आहेत
Last updated on 05 May 2026, 12:15 PM
More updates

.

TryMcq App
महाराष्ट्र पोलीस - मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका आणि चालू घडामोडी साठी

Install App

Get it on Google Play
<