MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मेगाभरती जाहीर Jun 25, 2026 9:49 PM महाराष्ट्र महसूल विभाग MPSC महाराष्ट्र नगरविकास विभाग ... Share Get the TryMCQ App Install the app for exams, updates, and faster access on your phone. Install # MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ | अधिकृत जाहिरात प्रसिद्धमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची अधिकृत जाहिरात (**Advertisement No. 017/2026**) २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण **२,६१९ जागांवर** मेगाभरती जाहीर झाली आहे. या भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:## महत्वाच्या तारखा (Important Dates)* **जाहिरात प्रसिद्धी:** २५ जून २०२६ * **ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक:** २७ जून २०२६ (दुपारी २:०० वाजल्यापासून) * **अर्ज करण्याची अंतिम तारीख:** १७ जुलै २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत) * **चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख:** २० जुलै २०२६ * **संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक:** २९ सप्टेंबर २०२६ (CBT - संगणक आधारित परीक्षा पद्धतीने घेण्याचे नियोजित आहे) ---## पदनिहाय रिक्त जागांचा तपशील (Vacancy Details)| पद क्र. | पदाचे नाव (Post Name) | विभाग (Department) | एकूण जागा (Vacancies) || :--- | :--- | :--- | :--- || १ | लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) | शासनाचे विविध विभाग | १,८६४ || २ | सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) | गृह विभाग | ४६१ || ३ | कर सहायक (Tax Assistant) | वित्त विभाग | २८२ || ४ | उद्योग निरीक्षक (Inspector of Industry) | उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग | ९५ || ५ | तांत्रिक सहायक (Technical Assistant) | वित्त विभाग | ३ || | **एकूण पदे (Total)** | | **२,६१९** |---## पात्रता निकष (Eligibility Criteria)### १. शैक्षणिक पात्रता:* **लिपिक-टंकलेखक & कर सहायक:** कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) + मराठी टंकलेखन (Typing) ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र.* **सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI):** १० वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी. * **उद्योग निरीक्षक:** सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान (Science) शाखेतील पदवी.* **तांत्रिक सहायक:** मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. ### २. वयोमर्यादा (०१ ऑक्टोबर २०२६ रोजी):* **किमान वय:** १८/१९ वर्षे (पदानुसार) * **अमागास (Open):** कमाल ३८ वर्षे * **मागासवर्गीय/आ.दु.घ (EWS)/अनाथ:** कमाल ४३ वर्षे ---## परीक्षा शुल्क (Application Fee)* **खुला प्रवर्ग (Open):** ₹५४४/-* **मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग:** ₹३४४/-> **विशेष टीप:** पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत शासनाकडून नवीन मागणीपत्रे आल्यास पदसंख्येमध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आयोगाने जाहिरातीत स्पष्ट केली आहे.---## परीक्षा संरचना (Exam Pattern) आणि सविस्तर अभ्यासक्रम (Syllabus)ही परीक्षा प्रामुख्याने दोन टप्प्यांत (आणि आवश्यकतेनुसार तिसऱ्या टप्प्यात टायपिंग/कौशल्य चाचणी) घेतली जाते:1. **संयुक्त पूर्व परीक्षा (Combined Prelims)** - १०० गुण2. **मुख्य परीक्षा (Mains Exam)** - ४०० गुण3. **कौशल्य चाचणी (Skill Test)** - केवळ लिपिक-टंकलेखक आणि कर सहायक पदांसाठी (पात्रता निकष) ### १. संयुक्त पूर्व परीक्षा (Prelims Exam Pattern)पूर्व परीक्षा सर्व ५ पदांसाठी सामाईक (Common) असते. यात एकूण १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न असतात. | घटक | तपशील || :--- | :--- || **एकूण प्रश्न** | १०० प्रश्न || **एकूण गुण** | १०० गुण (प्रत्येक प्रश्नाला १ गुण) || **वेळ** | १ तास (६० मिनिटे) || **नकारात्मक गुण (Negative Marking)** | १/४ (०.२५) - प्रत्येक ४ चुकीच्या उत्तरांमागे १ गुण वजा केला जाईल. || **काठिण्य पातळी** | पदवी स्तर (Graduation Level) |#### पूर्व परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Prelims Syllabus):* **चालू घडामोडी (Current Affairs):** जागतिक तसेच भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील घडामोडी. * **इतिहास (History):** आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. * **भूगोल (Geography):** महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, नद्या, पर्वत, पिके व उद्योगधंदे.* **अर्थव्यवस्था (Economics):** भारतीय अर्थव्यवस्था (राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, चलन आणि राजकोषीय नीती) आणि शासकीय अर्थव्यवस्था (अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी).* **राज्यशास्त्र (Polity):** भारताच्या राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, स्थानिक प्रशासन (ग्रामप्रशासन). * **सामान्य विज्ञान (General Science):** भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) आणि आरोग्यशास्त्र (Hygiene). * **अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (Aptitude & Intelligence):** * **बुद्धिमत्ता:** उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे मोजणारे प्रश्न. * **अंकगणित:** बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, टक्केवारी, नफा-तोटा, व्याज, वेळ आणि काम, आलेख.---### २. मुख्य परीक्षा (Mains Exam Pattern)पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. मुख्य परीक्षा एकूण ४०० गुणांची असते, ज्यामध्ये दोन स्वतंत्र पेपर्स असतात.#### मुख्य परीक्षा संरचना:* **पेपर १ (संयुक्त):** मराठी आणि इंग्रजी भाषा (२०० गुण | १०० प्रश्न | वेळ: १ तास)* **पेपर २ (सामाईक व पदनिहाय):** सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी (२०० गुण | १०० प्रश्न | वेळ: १ तास)> **टीप:** दोन्ही पेपर्समध्ये १/४ (०.२५) नकारात्मक गुण पद्धती लागू राहील. #### मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Mains Syllabus):##### पेपर १: भाषा विषय (२०० गुण)* **मराठी (१०० गुण):** सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण (संधी, समास, अलंकार इ.), म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.* **इंग्रजी (१०० गुण):** Vocabulary, Sentence Structure, Grammar (Voice, Speech, Tenses), Idioms & Phrases and their meanings, Reading Comprehension, Spotting Errors.##### पेपर २: सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता (२०० गुण)या पेपरमध्ये काही भाग सर्व पदांसाठी सामाईक असतो, तर काही भाग तुम्ही निवडलेल्या पदानुसार विशिष्ट (Post-Specific) तांत्रिक ज्ञानावर आधारित असतो:* **सामाईक घटक:** चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, भारतीय राज्यघटना (सविस्तर अभ्यास - मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, केंद्र-राज्य संबंध, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ भूमिका आणि कार्ये).* **संगणक व माहिती तंत्रज्ञान:** आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, netwrking, वेब तंत्रज्ञान, सायबर गुन्हे व त्यांचे प्रतिबंध.* **पदनिहाय विशेष घटक:** * **कर सहायक (Tax Assistant):** बुक-किपिंग आणि अकाऊंटन्सी (Book-keeping & Accountancy) चे मूलभूत सिद्धांत, GST, सेल्स टॅक्स आणि व्हॅट (VAT) संबंधी कायदे व आर्थिक सुधारणा. * **सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI):** ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी संबंधित तांत्रिक अभ्यासक्रम. * **उद्योग निरीक्षक (Industry Inspector):** उद्योग, कामगार कायदे आणि आर्थिक धोरणांशी संबंधित घटक.---### ३. कौशल्य चाचणी (Typing Skill Test)लिपिक-टंकलेखक आणि कर सहायक या पदांसाठी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केवळ 'पात्रता निकष' (Qualifying) स्वरूपाची संगणकावर टायपिंग चाचणी घेतली जाते:* **मराठी टायपिंग:** ३0 शब्द प्रति मिनिट (WPM) * **इंग्रजी टायपिंग:** ४0 शब्द प्रति मिनिट (WPM)*(कर सहायक पदासाठी दोन्ही भाषांचे आणि लिपिक पदासाठी निवडलेल्या भाषेचे प्रमाणपत्र व चाचणी आवश्यक असते).* परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (CBT) होणार असल्याने अभ्यासासोबतच वेळेचे व्यवस्थापन आणि सराव चाचण्या सोडवणे अत्यंत फायदेशीर ठरेल.---## आवश्यक कागदपत्रांची यादी (Documents Checklist)MPSC च्या प्रोफाईलमध्ये अपलोड करण्यासाठी आणि पडताळणीसाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा:* **ओळखपत्र:** आधार कार्ड किंवा पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स.* **वयाचा पुरावा:** १० वीचे बोर्ड सर्टिफिकेट (Board Certificate) या शाळा सोडल्याचा दाखला (LC).* **शैक्षणिक पात्रता:** १० वी, १२ वी आणि पदवी (Graduation) उत्तीर्ण गुणपत्रिका (Mark sheet) व पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate).* **अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate):** महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.* **जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate):** आरक्षित प्रवर्गातील (SC, ST, OBC, VJ-A, NT) उमेदवारांसाठी.* **Non-Creamy Layer (NCL) प्रमाणपत्र:** SC/ST वगळता इतर सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी चालू आर्थिक वर्षाचे वैध प्रमाणपत्र आवश्यक.* **EWS प्रमाणपत्र:** आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी २०२६-२७ या वर्षासाठी वैध असलेले प्रमाणपत्र.* **टायपिंग प्रमाणपत्र (Typing Certificate):** लिपिक आणि कर सहायक पदासाठी मराठी ३० श.प्र.मि. आणि/किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. चे GCC-TBC प्रमाणपत्र.* **इतर प्रमाणपत्रे (लागू असल्यास):** दिव्यांग प्रमाणपत्र (UDID), खेळाडू आरक्षण, अनाथ किंवा माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र.* **फोटो व स्वाक्षरी:** अलीकडील पासपोर्ट साईझ रंगीत फोटो (पार्श्वभूमी फिकट रंगाची) आणि पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी (दोन्हींची साईझ ५० KB पेक्षा कमी असावी).---## सर्वोत्तम संदर्भ पुस्तकांची यादी (Best Books List)### अ) पूर्व परीक्षा (Prelims) आणि मुख्य पेपर-२ साठी:| विषय | सर्वोत्तम संदर्भ पुस्तके (Authors / Publications) || :--- | :--- || **मराठी इतिहास** | डॉ. जयसिंगराव पवार किंवा समाधान महाजन (आधुनिक भारताचा इतिहास - विशेषतः महाराष्ट्र) / ११ वीचे जुने इतिहास पुस्तक (स्टेट बोर्ड). || **महाराष्ट्र भूगोल** | ए. बी. सवदी (दीपस्तंभ प्रकाशन) किंवा खतीब सर यांचे पुस्तक. || **भारतीय राज्यघटना** | 'रंजन कोळंबे' (भारतीय राज्यघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्था) किंवा 'एम. लक्ष्मीकांत' (मराठी अनुवाद). || **भारतीय अर्थव्यवस्था** | रंजन कोळंबे सरांचे 'भारतीय अर्थव्यवस्था' किंवा किरण देसले (दीपस्तंभ भाग-१). || **सामान्य विज्ञान** | सचिन भस्के सरांचे पुस्तक या अनिल कोलते सर (सोबत ८ वी ते १० वीची स्टेट बोर्डची पुस्तके). || **बुद्धिमत्ता व अंकगणित** | पंढरीनाथ राणे यांचे पुस्तक. || **चालू घडामोडी** | 'परिक्रमा' मासिक (Prithvi Parikrama) किंवा 'सिम्प्लीफाईड' (Simplified) चालू घडामोडी - अभिनव प्रकाशन. |### ब) मुख्य परीक्षा (Mains) पेपर-१ साठी:* **मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे यांचे मराठी व्याकरण.* **इंग्रजी व्याकरण (English Grammar):** बाळासाहेब शिंदे यांचे इंग्रजी व्याकरण---## अर्ज करताना आणि अभ्यास करताना घ्यायची काळजी### १. अर्ज करताना घ्यायची काळजी (Precautions While Applying)* **प्रोफाईल अपडेट (Profile Update):** अर्ज करण्यापूर्वी तुमचे MPSC प्रोफाईल पूर्णपणे अपडेट करा. जात, नॉन-क्रिमी लेअर (NCL) आणि टायपिंगची अचूक माहिती भरा.* **कागदपत्रांची वैधता (Document Validity):** तुमचे NCL आणि EWS प्रमाणपत्र सध्याच्या आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) वैध असल्याची खात्री करा.* **अंतिम तारखेची वाट पाहू नका:** शेवटच्या दिवसांमध्ये सर्व्हर डाऊन होण्याचा धोका असतो, त्यामुळे १५ जुलैपूर्वीच अर्ज सबमिट करा.* **टायपिंग माहिती:** लिपिक आणि कर सहायक पदासाठी टायपिंग स्पीड (मराठी ३० / इंग्रजी ४०) अचूक निवडा; प्रमाणपत्र क्रमांकामध्ये चूक करू नका.* **अंतिम पडताळणी:** फी भरण्यापूर्वी नावाचे स्पेलिंग, जन्मतारीख आणि प्रवर्ग (Category) पुन्हा तपासा. एकदा अर्ज सबमिट केल्यावर बदल करता येत नाही.### २. अभ्यास करताना घ्यायची काळजी (Precautions During Preparation)* **मर्यादित पुस्तके (Limited Resources):** एकाच विषयासाठी ४-५ पुस्तके वाचण्याऐवजी १ सर्वोत्तम संदर्भ पुस्तक + स्टेट बोर्ड एवढेच साहित्य ठेवा आणि त्याचीच वारंवार उजळणी (Revision) करा.* **PYQ कडे दुर्लक्ष नको:** केवळ वाचन करू नका; आयोगाने मागील परीक्षांमध्ये (२०२३ ते २०२५) नेमके कसे प्रश्न विचारले आहेत, याचा रोज अभ्यास करा.* **वेळेचे नियोजन (Time Management):** पूर्व परीक्षााला फक्त १ तास (६० मिनिटे) मिळतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.* **नकारात्मक गुणांचे भान (Negative Marking):** परीक्षेत १/४ (०.२५) नेगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे अंदाज लावून उत्तरे देण्याची सवय टाळा; अचूकतेवर (Accuracy) भर द्या.* **भाषा विषयांकडे दुर्लक्ष करू नका:** अनेक विद्यार्थी फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करतात. मुख्य परीक्षेचा मराठी आणि इंग्रजी व्याकरण हा भाग मेरिट यादीत येण्यासाठी गेम-चेंजर ठरतो, त्याचा अभ्यास आत्तापासूनच रोज १ तास करा.```